Advertisement

भारतात ८० टक्के नागरिक आरोग्य विम्यापासून वंचित

आरोग्य विमा गरिबांपासून आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गापर्यंत सर्वासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतकी मूलभूत गरज बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे होणारा आजारांवरील उपचाराचा खर्च पाहता आरोग्य विम्याचं संरक्षण अनिर्वायच आहे.

भारतात ८० टक्के नागरिक आरोग्य विम्यापासून वंचित
SHARES

आर्थिक नियोजनातील अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे आरोग्य विमा (मेडिक्लेम) असून केंद्र सरकारनेसुद्धा या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये आरोग्य विम्याची योजना जाहीर केली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वोक्हार्ट हॉस्पिटलने रुग्णांना आरोग्य विमा सेवा अधिक सहजपणे मिळावी या हेतूने द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या सहकार्याने कियाॅस्क डेस्क सुरू केला आहे.


'आरोग्य विमा' मूलभूत गरज

आरोग्य विमा गरिबांपासून आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गापर्यंत सर्वासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतकी मूलभूत गरज बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे होणारा आजारांवरील उपचाराचा खर्च पाहता आरोग्य विम्याचं संरक्षण अनिर्वायच आहे.


कुटुंबीयांची धावपळ

तरीही भारतामध्ये अजूनही ८० टक्के नागरिक आरोग्य विम्यापासून दूर असून कुटुंबातील कमावती व्यक्ती आजारी पडल्यावर त्याच्या कुटुंबीयांची फार धावपळ होते. तर, कधी कधी पैसे नसल्यामुळे स्वतःचं घर अथवा मालमता विकून उपचार करावे लागतात.

म्हणूनच मुंबईकरांना आरोग्य विम्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये एका कियाॅस्क (डेस्क) ची सुरुवात केली आहे. या डेस्कद्वारे कॅशलेस विमा, आरोग्य विम्याबाबत असलेल्या शंका, पॉलिसीच्या अटींशी निगडीत प्रश्न अशा सर्व समस्यांची उकल करण्यात येणार असून या डेस्कमुळे गरजूंमध्ये वैद्यकीय विम्याची जागरुकता वाढण्यास मदत होणार असल्याचं मत वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. पराग रिंदानी यांनी व्यक्त केलं.


अडथळा-मुक्त कॅशलेस उपचार

तर, आरोग्य विमा अधिक सुलभ पद्धतीने वापरण्याकरिता आमच्या या योजनेत "बेस्ट केअर डेस्क" उभारण्यात आला असून या डेस्कवर प्रतिनिधी आणि डॉक्टर्स उपलब्ध असतील. या डेस्कमुळे पॉलिसीधारकांना अडथळा-मुक्त कॅशलेस पद्धतीने उपचार करुन घेता येणार आहेत, अशी माहिती द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीचे जनरल मॅनेजर सिद्धार्थ प्रधान यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा