Advertisement

मुंबईतील 17 प्रोजक्ट्सच्या कामांना मिळणार वेग

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

मुंबईतील 17 प्रोजक्ट्सच्या कामांना मिळणार वेग
SHARES

मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (mmrda) शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकतीच सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे आणि प्रकल्प अभियंत्यांची भेट घेऊन प्रकल्पांच्या परवानग्या मिळण्यास होत असलेल्या विलंबावर चर्चा केली.

या बैठकीमुळे नऊ महत्त्वाच्या प्रकल्पांच्या (projects) 17 प्रलंबित परवानग्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांमध्ये शिवडी-वरळी (worli) एलिव्हेटेड कनेक्टर आणि अनेक मेट्रो (mumbai metro) मार्गांचा समावेश आहे. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला गती मिळेल.

मेट्रो लाइन 2B

* मिलन सबवे जंक्शन ते एस.व्ही. रस्ता येथे वाहतूक सेवेचा विस्तार 

* डी.एन.नगर ते मांडले पर्यंत उंची मापक बसवणे

* पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे आरओबीजवळ वाहतूक वळवण्यात येणार 

मेट्रो लाइन 6

* IIT पवई येथे वाहतूक वळवण्यात येणार

* साकी विहार ते रामबाग येथील वाहतूक वळवणार

Advertisement

* BC02R पॅकेजसाठी (महाकाली लेणी ते पवई तलाव) वाहतूक सेवेचा विस्तार

* P103 जवळ वाहतूक व्यवस्थापन

मेट्रो लाइन 7A

* वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील एलिव्हेटेड स्ट्रेचसाठी वाहतूक सेवेचा विस्तार

मेट्रो लाईन 9

* दहिसर (पू.) ते मीरा- भाईंदर या मार्गासाठी वाहतूक विस्तार करणार

शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्प

* आचार्य दोंदे मार्गावरील सिग्नल खांब हलवणार(P31-P32)

* आचार्य दोंदे मार्गावरील गर्डर लॉन्चसाठी एल्फिन्स्टन रोडवरील रस्ता बंद करणार

आकुर्ली सबवे (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे)

* भुयारी मार्गाचे रुंदीकरण आणि बांधकाम

एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प

* सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला ते वाकोला फ्लायओव्हरपर्यंत उन्नत कॉरिडॉरचे डिझाइन आणि बांधकाम

Advertisement

* वाकोला जंक्शन, बीकेसी जंक्शन, एमटीएनएल जंक्शन आणि एलबीएस फ्लायओव्हर कव्हर करण्यात येणार.



हेही वाचा

दर रविवारी क्रिडाप्रेमींसाठी पाम बीच खुला करणार

ठाणे : ईडीकडून दाऊद इब्राहिमच्या भावाचा फ्लॅट जप्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा