Advertisement

मेट्रो-३ मार्गिकेचं ७६ टक्के भुयारीकरण पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी एकूण ५५ किमी लांबीचं भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी ७६ टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे.

मेट्रो-३ मार्गिकेचं ७६ टक्के भुयारीकरण पूर्ण
SHARES

मुंबईतील महत्वाकांशी असलेल्या मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाला गती मिळत आहे. आतापर्यंत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी एकूण ५५ किमी लांबीचं भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी ७६ टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. तसंच, हे काम १७ टनेल बोरिंग मशीनच्या (TBM) साहाय्यानं करण्यात येत आहे. डिसेंबर २०२० पर्यंत हे भुयारीकरण पूर्ण करण्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (MMRCL) लक्ष्य आहे.

मेट्रो-३ प्रकल्पामध्ये भुयारीकरणासह इतर कामांनाही वेग आला आहे. या संपूर्ण मार्गिकेवरील स्थानकांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांपैकी ६ स्थानकांच्या स्लॅबचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. यामध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका आणि एमआयडीसी अशा ६ मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचं १०० टक्के काम पूर्ण झालं आहे.

२६ मेट्रो स्थानकांपैकी १३ स्थानकांचे भुयारीकरणाचं काम १०० टक्के पूर्ण झालं असून, उर्वरित १३ मेट्रो स्थानकांचं भुयारीकरण येत्या ३ ते ४ महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. ६ मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचं काम पूर्ण झाल्यानं इतर कामांनाही आता गती येणार आहे.

मेट्रो मार्गिकेसाठी ५५ किमीचं भुयारीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेनं ६ व्यावसायिक केंद्रे, ५ उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ व लोकलनं न जोडलेले परिसर जोडले जाणार आहेत.

मेट्रो-३ मार्गिकेचं काम एकूण १७ टीबीएमच्या साहाय्यानं करण्यात येत असून, आत्तापर्यंत ३२ ब्रेकथ्रूपैकी २५ ब्रेकथ्रू पूर्ण करण्यात आले आहेत. आता फक्त ७ ब्रेक थ्रू शिल्लक आहेत. या उर्वरित ब्रेकथ्रूचं कामही आता वेगानं करण्यात येत आहे. मेट्रो स्थानकांच्या स्लॅबच्या कामासह मेट्रो-३ मार्गिकेचं संचलन आणि देखभाल कामाच्या निविदा लवकरच मागविण्यात येणार आहेत, तर जायकाच्या कर्जाचा तिसरा टप्पा मार्चपर्यंत येणं अपेक्षित आहे. या वर्षी मार्गासाठी रूळ टाकण्याचं काम सुरू होणं अपेक्षित आहे. यासह विविध प्रणालींच्या कामात आरेखन काम पूर्ण होऊन उपकंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

महिनाअखेरपर्यंत सर्व टोल नाक्यांवर सुरू होणार फास्टॅग

मुंबईच्या तरुणीवर अलिबागमध्ये अत्याचार



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा