अंधेरी पश्चिमेतील जेपी रोड जंक्शनजवळील एसव्ही रोडला लागून असलेली एक संपूर्ण चाळ बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पाडली . यामुळे पूर्वीच्या गोखले रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी, जोगेश्वरी ते विलेपार्लेकडे जाणे सोईस्सोकर झाले आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
एसव्ही रोडच्या जेपी रोड जंक्शनजवळ रस्ता रुंदीकरणासाठी रहदारीला अडथळा निर्माण करणारी चाळ पाडण्यात आली.
“निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारे इथे नागरिक स्थायिक होते. कुरार पॅटर्नच्या आधारे आम्ही जवळच्या म्युनिसिपल मार्केटमध्ये व्यावसायिक आस्थापनांना सामावून घेऊ आणि जे पूर्णपणे बाधित आहेत त्यांना पर्यायी निवासस्थान दिले जाईल, ”के पश्चिम प्रभागातील एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले.
एसव्ही रोडचा भाग, जिथे चाळी पाडण्यात आली होती, त्या भागाचे 25 फूट रुंदीकरण करून पूर्ण 90 फूट रस्ता बनवण्यात येणार आहे. पाडण्याची प्रक्रिया किचकट होती आणि पालिका गेल्या दीड वर्षांपासून नोटीस बजावत होती.
“आम्ही कागदपत्रांची पडताळणी केली आणि कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन केले. हा रस्ता रुंदीकरण फार पूर्वीपासून प्रलंबित होता,” अधिकारी म्हणाले.
स्थानिक आमदार अमित साटम म्हणाले की, पाडण्यात आलेल्या बांधकामांपैकी एक - क्रॅस्टो चाळ - अनेक वर्षांपासून होती आणि तेथील व्यावसायिक इमारतींच्या मालकांनी दीड वर्षांपूर्वी पालिकेशी संपर्क साधला होता.
“पालिकेने त्या पात्र आणि अपात्र बांधकामांची यादी तयार केली आणि त्यानुसार पाडली. एसव्ही रोडचे आता रुंदीकरण होणार आहे. गोरेगावकडे जाताना पोलीस बीट चौकीजवळ जेपी रोडवर डावीकडे वळण लागते. येथेच बांधकाम पाडण्यात आले,” असे साटम म्हणाले.
हेही वाचा