Advertisement

पंतप्रधान आवास योजनेत 40 हजार घरं


पंतप्रधान आवास योजनेत 40 हजार घरं
SHARES

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मुंबई महानगर प्रदेशात 40 हजार घरं बांधण्यात येणार आहेत. या घरांसाठी दोन महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र जमिनीचं हस्तांतरण झालं नसल्याचं सांगत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी निविदेला स्थगिती दिली होती. अखेर जमीन हस्तांतरणाचा तिढा मंडळानं सोडवला असून 40 हजार घरं बांधण्याचा मार्गही मोकळा केला आहे. त्यानुसार नुकत्याच या 40 हजार घरांसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती कोकण मंडळानं दिली आहे.

या निविदेनुसार वारवे, खोणी शिरगाव, भंडार्ली आणि गोठेघर येथे ही घरं बांधण्यात येणार आहेत. 40 हजारांपैकी 27 हजार 496 घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी तर 5 हजार 238 घरं अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करत बांधकामाचं कंत्राट देत बांधकाम सुरू करण्यासाठी बराच अवधी आहे. तर, बांधकाम सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच वर्षात काम पूर्ण करून घेण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यामुळे ही घरं पूर्ण होऊन घरांची सोडत निघण्याकरता साधरणत: चार वर्षांचा अवधी अपेक्षित आहे. महत्त्वाचं, म्हणजे या घरांची विक्री केवळ आणि केवळ सोडत पद्धतीेने होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जे अर्ज भरून घेतले जात आहेत ते केवळ सर्वेक्षणासाठीच असल्याचं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा