Advertisement

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच पूर्ण करणार- जितेंद्र आव्हाड

सर्वांचाच बीडीडी पुनर्वसन प्रकल्पाबाबत विश्वास अधिक दृढ होईल आणि हा प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होईल, असं आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात दिलं.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच पूर्ण करणार- जितेंद्र आव्हाड
SHARES

ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतल्या पात्र २७२ रहिवाश्यांच्या पुनर्वसन होऊ घातलेल्या इमारतीतील सदनिकांची निश्चिती करून त्यांचा विश्वास संपादन करण्याचं काम शासनाने केलं आहे. ज्यामुळे सर्वांचाच बीडीडी पुनर्वसन प्रकल्पाबाबत विश्वास अधिक दृढ होईल आणि हा प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होईल, असं आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात दिलं. 

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ इथं पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये म्हाडा संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या २७२ पात्र भाडेकरूंना वितरित करण्यात येणाऱ्या सदनिका संगणकीय प्रणालीद्वारे निश्चितीचा शुभारंभ मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, सदनिका निश्चित झालेल्या सर्व पात्र भाडेकरूंबरोबर लवकरच करार केला जाणार असून या करारात त्यांना निश्चित झालेली सदनिका, इमारतीचा क्रमांक, सदनिकेचा मजला नमूद केला जाईल. मुंबईतील म्हाडाच्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करून परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. म्हाडाचा विस्तार मुंबईबाहेरही अधिक व्हावा यासाठी गृहनिर्माण धोरण तयार केलं जात आहे. म्हाडाकडे येत्या ५ वर्षात मुंबईबाहेर परवडणाऱ्या दरातील सदनिका उभारण्यासाठी सुमारे ५ हजार एकर जमीन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Advertisement

हेही वाचा- राजभवन सचिवालयाने खातरजमा करायला हवी होती..., ठाकरे सरकारने आरोप

तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) म्हणाले, हा क्षण मुंबईसाठी महत्त्वाचा आहे कारण मुंबईच्या जडणघडणीत बीडीडी चाळी एक महत्त्वाचा घटक ठरतात. दोन ते तीन पिढ्यांना आश्रय देणाऱ्या या चाळी  लवकरच नवीन रूप धारण करतील आणि या प्रकल्पाच्या नियोजनातून मुंबई शहराची  नगररचना देखील सुटसुटीत होण्यास मदत होईल. बीडीडी चाळींमधील भाडेकरू/रहिवाशांची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम वेळेत व दर्जेदार होणार आहे.

मुंबई शहरचे पालक मंत्री अस्लम शेख (aslam sheikh) यांनी ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील पात्र २७२ भाडेकरूंचं अभिनंदन केलं. सदनिका निश्चितीच्या माध्यमातून बीडीडी चाळींतील भाडेकरूंमध्ये सकारात्मक संदेश गेला असून हा प्रकल्प निश्चितीच लवकर पूर्ण होणार आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे जनमानसातील संभ्रम नष्ट होऊन या प्रकल्पाला नवीन दिशा मिळाली आहे, असं सांगितलं.  

Advertisement

ना. म. जोशी मार्ग परळ इथं सुमारे ५ हेक्टर जागेवर एकूण ३२ चाळी असून त्यामध्ये एकूण २५६० कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांची पात्रता निश्चित करणे व तद्नुषंगिक बाबींसाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन) कुलाबा विभाग, मुंबई शहर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. अद्यापपर्यंत १० चाळींतील ८०० भाडेकरूंचे पात्रतेबाबत सर्वेक्षण करण्यात आलं असून ६०७ भाडेकरू आतापर्यंत पात्र ठरले आहेत. संक्रमण गाळ्यात स्थलांतरित होण्यासाठी आतापर्यंत म्हाडाने पात्र भाडेकरूंपैकी (लाभार्थी) ३१४ भाडेकरूंशी जागेवरच करारनामा पंजीकृत करून घेतला असून यापैकी २७२ भाडेकरू संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झाले आहेत.

(maharashtra housing minister jitendra awhad on bdd chawl redevelopment project)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा