Advertisement

म्हाडाची मास्टर लिस्ट आता आॅनलाइन, रहिवाशांची फसवणूक थांबवणार

म्हाडाने मास्टर लिस्ट आॅनलाइन केली असून वर्षानुवर्षे ट्रान्झिस्ट कॅपमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मास्टर लिस्टमध्ये सामावून घेण्यात येणार आहे.

म्हाडाची मास्टर लिस्ट आता आॅनलाइन, रहिवाशांची फसवणूक थांबवणार
SHARES

मागील काही वर्षांपासून ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास (म्हाडा) प्राधिकरणाने चांगली बातमी दिली आहे. म्हाडाने मास्टर लिस्ट आॅनलाइन केली असून वर्षानुवर्षे ट्रान्झिस्ट कॅपमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मास्टर लिस्टमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. मास्टर लिस्टमध्ये समावेश होण्याकरीता अर्ज करण्यासाठी रहिवाशांना १६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  

१६ जुलैपर्यंत आलेल्या अर्जांमधून पात्र आणि अपात्र रहिवाशांची यादी तयार करण्यात येईल. बऱ्याचदा वडिलांच्या नावावर असलेल्या घरावर त्यांची मुलं दावा करतात. त्यामुळे कायदेशीर सुनावणी घेऊन पात्र आणि अपात्र रहिवासी ठरवण्यात येतील.

दलालांना आळा

बऱ्याचदा काही दलाल मास्टर लिस्टमधील घरे मिळवून देण्याच्या नावाखाली ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची फसवणूक करतात. त्यासाठी खोट्या भाडेकऱ्यांच्या नावे कागदपत्रं बनवली जातात. परंतु तपासणीत ही कागदपत्रे किंवा संबंधित नावाचा कुणीही भाडेकरू नसल्याचं सिद्ध झाल्यावर रहिवाशांची फसवणूक झाल्याचं पुढं येतं. अशा बऱ्याच तक्रारी ही प्रक्रिया आॅनलाइन झाल्यावर संपुष्टात येतील, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुर्नरचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.     

फाइलचा तपशील कळणार

मास्टर लिस्टमध्ये अनेकदा फाइल्स गहाळ व्हायच्या तर काही वेळेस फाईल्स केवळ या टेबलवरून त्या टेबलवर फिरत राहायच्या. आपली फाईल नेमकी कुठे अडकलीय हेच रहिवाशांना कळत नसायचं. , आपल्या घराचं काय झालं? याची माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागायच्या. मात्र यापुढं संबंधित भाडेकरू तसंच रहिवाशांना त्यांच्या फाइल्सची माहिती एसएमएसवर मिळेल, असंही घोसाळकर म्हणाले. तसंच ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहाणाऱ्यांना सेवाशुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा जुलैच्या पहिल्या आठवडयापासून सुरू होणार आहे.  

कोण करू शकतात अर्ज?

  • १ जानेवारी २०१७ नंतर मास्टर लिस्ट कमिटीने पात्र घोषित केलेल्या व्यक्तींनी नव्याने अर्ज दाखल करू नये.
  • या आधी मास्टर लिस्टसाठी अर्ज केलेल्या, परंतु प्रकरण प्रलंबित असणाऱ्या रहिवाशांनीच पुन्हा ऑनलाइन अर्ज करावेत. 
  • मास्टर लिस्ट कमिटीने अपात्र घोषित केलेल्या अर्जदारांना आक्षेप नोंदवण्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल.

 


हेही वाचा-

३ लाचखोर म्हाडा अधिकारी 'एसीबी'च्या ताब्यात

'मोतीलालनगरचा पुनर्विकास स्थानिकांना विश्वासात घेऊनच करा' - शालिनी ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा