Advertisement

म्हाडा कार्यालयावर गिरणी कामगारांचा मोर्चा


म्हाडा कार्यालयावर गिरणी कामगारांचा मोर्चा
SHARES

मुंबई - बॉम्बे डाईंग, श्रीनिवाससह अन्य 10 गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी घरांचं बांधकाम सुरू असताना या गिरण्यातील कामगारांना मुंबईबाहेर हाकलत सरकार अन्याय करत असल्याचं म्हणत गिरणी कामगार म्हाडाच्या कार्यालयावर धडकले. ज्या कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध होत असतील त्या कामगारांना मुंबईतच घरं उपलब्ध करून द्यावीत आणि यासाठी 2 डिसेंबरच्या सोडतीतून त्यांची नावं वगळावीत आणि कामगारांच्या अर्जांची छाननी करत सोडत काढावी या मागणीसाठी गिरणी कामगार म्हाडावर धडकलेत. यावेळी एकजुटीच्या शिष्टमंडळानं म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांची भेट घेत आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्यात. मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर सोडतीची प्रक्रिया होत असून, यात म्हाडाला हस्तक्षेप करता येत नसल्याच सांगत लाखे यांनी चेंडू सरकारच्या कोर्टात फेकला. दरम्यान जर गिरणी कामगारांना न्याय मिळाला नाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ अशी माहिती एकजुटीचे प्रचारक बी.के.आंब्रे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा