Advertisement

मुंबईतील 'हा' पूल जून २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी राहणार बंद

आयआयटी मुंबई आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त पाहणीत हा पूल धोकादायक ठरवण्यात आलेला आहे.

मुंबईतील 'हा' पूल जून २०२४ पर्यंत वाहतूकीसाठी राहणार बंद
(File Image)
SHARES

शहरातील पी डिमेलो मार्गावरून मनीष मार्केट, झवेरी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, महापालिका मुख्यालय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणारा कर्नाक बंदर पूल जून २०२४ पर्यंत बंद राहणार आहे.

दीडशे वर्षे आयुर्मान पूर्ण झालेला ब्रिटीश बनावटीचा कर्नाक पूल पाडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र रेल्वे व पालिका प्रशासनाला दिले आहे.

२० ऑगस्ट ते २० नोव्हेंबर या काळात पूल पाडावा आणि त्यानंतरच्या १९ महिन्यांत पुलाची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी यावेळी दिल्या आहेत.

शहरातील प्रमुख पुलांमध्ये कर्नाक बंदर पुलाचा समावेश आहे. त्यामुळे पूल बंद झाल्यानंतर मुक्तमार्ग सोडल्यानंतर सीएसएमटी, फोर्ट दिशेला जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

वाहतूक पोलिसांच्या सूचना

  • संभाव्य कोंडी लक्षात घेता वाहतूक नियोजनासाठी ७० वाहतूक मदतनीस (वॉर्डन), १०० चमकणारे दिवे (ब्लिनकर्स), ५० रिफ्लेकटर जॅकेट, ५० बटन आणि ५० दिशादर्शक फलक उपलब्ध करून द्याव्यात.

  • आप्तकालीन परिस्थिती उदभवल्यास बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी एक हेवी लोड क्रेन २४ तास उपलब्ध करून द्यावी

  • वाहतूक नियोजनासाठी ७० वॉर्डन आणि वाहतूक पोलिसांनी मागणी केलेले सहित्य उपलब्ध करून घ्यावे, अशी सूचना मध्य रेल्वेने महापालिकेला केली आहे.
  • येत्या काही दिवसात मदतनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

आयआयटी मुंबई आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त पाहणीत कर्नाक पुल धोकादायक ठरवण्यात आलेला आहे. हा पूल पाडून याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पूल बंद करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसात कर्नाक पूल पाडकामाला सुरुवात होईल, असे मध्य रेल्वेने कळवले आहे.



हेही वाचा

अंधेरी ते वर्सोवा अंतर लवकरच गाठता येणार 5 मिनिटात, जाणून घ्या कसं?

दिवाळीत मुंबईतील म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा