Advertisement

कोस्टल रोडचा अंतिम टप्पा 26 जानेवारी रोजी खुला होणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या 10.58 किमी दक्षिण कनेक्टरचे उद्घाटन होणार आहे.

कोस्टल रोडचा अंतिम टप्पा 26 जानेवारी रोजी खुला होणार
SHARES

मुंबई (mumbai) कोस्टल रोड प्रकल्पाचा (coastal road project) शेवटचा टप्पा हा वांद्रे (bandra)-वरळी सी लिंक (BWSL) ते मरीन ड्राइव्ह (marine drive) पर्यंत आहे. तसेच हा टप्पा 26 जानेवारी 2025 पर्यंत नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे कोस्टल रोडच्या 10.58 किमी दक्षिण कनेक्टरचे उद्घाटन करणार आहेत.

जेव्हा वाहनचालक दक्षिण मुंबईहून येत असतील तेव्हा ते कोस्टल रोड कनेक्टरद्वारे BWSL द्वारे थेट शहराच्या उत्तरेकडे जाऊ शकतात. तसेच त्यांना उत्तरेकडे वरळीतील खान अब्दुल गफ्फार खान मार्गावर उतरून नंतर कोस्टल रोडवर जावे लागेल.

आता, प्रकल्पाच्या दक्षिणेकडील बाजूचे काम पूर्ण झाल्यामुळे कोणीही उत्तरेकडून दक्षिणेकडे थेट जाऊ शकते म्हणजेच सी-लिंकपासून ते मरीन ड्राइव्हपर्यंत जाता येऊ शकते, असे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, महानगरपालिकेने कोस्टल रोडवर कॅमेरे बसवण्याचे काम जलद गतीने सुरू केले आहे, हे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

हे नवीन कॅमेरे वेगात जाणाऱ्या वाहनांचे नोंदणी क्रमांक स्वयंचलितपणे कॅप्चर करतील, ज्याद्वारे चालकाच्या फोनवर थेट ई-चलान पाठवले जाईल.

कोस्टल रोडच्या खुल्या भागांवर वेग मर्यादा 80 किमी/तास आहे, तर बोगद्यांच्या आत 60 किमी/तास आहे. सध्या, 154 कॅमेरे बोगद्यांच्या आत वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात आले आहेत.

मार्च ते डिसेंबर 2024 पर्यंत दक्षिणेकडे जाणारा कोस्टल रोडवरील वाहनांची संख्या सातत्याने वाढली आहे. मार्चमध्ये, दररोज सरासरी 13,874 वाहने धावत होती, ही संख्या डिसेंबरमध्ये 23,099 पोहोचली होती.



हेही वाचा

वाशी मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी दाखल

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी "या" चौकाचे नूतनीकरण होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा