Advertisement

मुंबईतील पायाभूत सोईंसाठी २.७५ लाख कोटी रुपये

मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळं ही वाढणारी लोकसंंख्या लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी, सरकारनं मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक सेवेकडं विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील पायाभूत सोईंसाठी २.७५ लाख कोटी रुपये
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. ही वाढणारी लोकसंंख्या लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी, सरकारनं मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक सेवेकडं विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पायाभूत सुविधा आणि वाहतूक प्रकल्पांसाठी २.७५ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं घेतला असून, पुढील ६ वर्षांत या रकमेचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबईत पायाभूत सुविधांच्या कामाला यापुर्वीच सुरुवात झाली आहे. त्याशिवाय मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) आणि रेल्वेच्या बोरिवली-विरार मार्गावर देखील अतिरिक्त काम करण्यात येत आहे. 


रेल्वेवर विशेष लक्ष

मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-३ प्रकल्पामध्ये वसई-विरार चौथी मार्गिका, पनवेल-कर्जत उपनगरीय दुहेरी मार्ग यांसारख्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी घेण्यात आलेले कर्ज २०३८ मध्ये हे कर्ज फेडण्यात येणार आहे.  त्याशिवाय मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-३ए मध्ये अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्ग, पनवेल-विरार कॉरिडोर, गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तार, बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, स्थानक विकास यांसारख्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.



हेही वाचा -

मतदान, मतमोजणी दरम्यान ३ दिवस 'ड्राय-डे'

कुलाब्यातली झपाटलेली 'मुकेश मिल' शुटींगसाठी होणार बंद



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा