पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राला मोठी भेट देण्यात आली. नवीन बंदर (Port) बांधण्यासाठी सरकार येत्या 5 वर्षात 76000 कोटी खर्च करणार आहे.
महाराष्ट्रातील पालघर (palghar) जिल्ह्यातील वाढवण (Wadhvan) बंदराला सरकारने मंजुरी दिली आहे. या बंदरासाठी सरकार 76200 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. या बंदराला रेल्वे आणि विमानतळासोबत उत्तम कनेक्टीव्हीटी असणार आहे.
9 कंटेनर टर्मिनस आणि एक मेगा कंटेनर पोर्ट असणार आहे. या बंदराचा पहिला टप्पा 2029 मध्ये होणार आहे. जगातील टॉप 10 बंदरांमध्ये या बंदराचा समावेश असणार आहे. तसेच हे बंदर मुंबईपासून जवळपास 150 किमी असणार आहे.
बंदराच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून ते स्थानिकांच्या हितासाठी तयार करण्यात येणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे बंदर भारत मिडल ईस्ट कॉरिडोर (Middle East Coridor) साठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बंदरावर तटरक्षक दलाचा स्वतंत्र बर्थ असणार आहे. याशिवाय इंधन बर्थ देखील असणार आहे.
हे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण समिती (JNPT) आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड (MMB) संयुक्तपणे बांधणार आहे. हे बंदर बांधण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण समितीचा 74 टक्के आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा 26 टक्के हिस्सा असणार आहे. तसेच या बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा