Advertisement

नरिमन पॉइंटला कुलाब्याशी जोडण्यासाठी सी-लिंक बांधणार

MMRDA नं त्यासाठी निविदा काढल्या आहेत आणि २४ महिन्यांची मुदत जाहीर केली आहे.

नरिमन पॉइंटला कुलाब्याशी जोडण्यासाठी सी-लिंक बांधणार
(Representational Image)
SHARES

येत्या दोन वर्षांत नरिमन पॉइंट ते कुलाबा कफ परेड हा प्रवास अतिशय सोपा होणार आहे. दक्षिण मुंबईच्या या भागात १.६ किमी लांबीचा पूल बांधण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

या संदर्भात, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा अद्भुत ड्रीम प्रोजेक्ट सन २०२१ पर्यंत पूर्ण करण्यासाठी निविदा जारी केली आहे. त्यामुळे लवकरच त्याचे काम सुरू होईल आणि २ वर्षात पूर्ण काम पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

विशेष म्हणजे नरिमन पॉइंटपासून कफ परेडचे अंतर कमी करण्यासाठी समुद्रावरील १.६ किमी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे.

समुद्रातून जाणारा हा १.६ कि.मी. लांबीच्या आणि विशेष पुलावर एकूण ४ लेन असतील. यामध्ये नरिमन पॉइंटच्या २ लेन आणि कुलाब्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी २ लेन करण्यात येणार आहेत. या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे २८४ कोटी रुपये खर्च येणार आहेत.

या पुलाच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर वांद्रे-वरळी सी लिंकवरून येणारी वाहनं वरळीजवळ बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलावरून अवघ्या काही मिनिटांत कुलाब्याला पोहोचतील. सध्या लोकांना हे अंतर कापण्यासाठी २० ते ३० मिनिटे लागतात.

Advertisement

मुंबईच्या समुद्रावर बांधल्या जाणार्‍या या तिसर्‍या पुलाचे बांधकाम येत्या मे महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएनं कंत्राटदार कंपनीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर कंत्राटदाराची निवडही ७ एप्रिलपर्यंत केली जाणार आहे.

पुलाच्या बांधकामासोबतच १० वर्षे पुलाच्या दुरुस्तीची आवश्यक जबाबदारीही ठेकेदार कंपनीला घ्यावी लागणार आहे.

२०२२-२३ च्या बजेटमध्ये MMRDA नं पुलाच्या बांधकामासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचवेळी २०१० सालीच वांद्रे ते वरळी दरम्यान ५.६ कि.मी. लांबलचक सी लिंक तयार करण्यात आला होता.

सध्या वांद्रे ते वर्सोवा हे अंतर १७.७ किमी आहे. या मार्गावर सी लिंकच्या उभारणीचे काम सध्या जोरात सुरू आहे.

Advertisement



हेही वाचा

लवकरच, दक्षिण मुंबई ते ठाणे दरम्यानचा प्रवास सोईस्कर

विविध मेट्रो प्रकल्पांसाठी ६ हजार ६०४ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा