Advertisement

नवी मुंबई विमानतळ आणि नैना प्रकल्प महाराष्ट्राला पॉवरहाऊस बनवू शकतात: मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी भूस्खलनग्रस्त कुटुंबांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले.

नवी मुंबई विमानतळ आणि नैना प्रकल्प महाराष्ट्राला पॉवरहाऊस बनवू शकतात: मुख्यमंत्री
SHARES

“सिडकोद्वारे विकसित होत असलेल्या नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ ( navi mumbai airport) आणि नैना शहर प्रकल्पांमध्ये (naina project) महाराष्ट्राला (maharashtra) देशाचे पॉवर हाऊस (power house) बनविण्याची क्षमता आहे”, असे  मत मुख्यमंत्री (chief minister) एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी व्यक्त केले.

सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात 26,502 घरांच्या सामूहिक गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ, नैना टीपीएस 8 ते 12 अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे, ठाणे अर्बन क्लस्टर (नवीन 3833 सदनिका) आणि वेस्टर्न पेरिफेरल रोड या बाबत मुख्यमंत्री बोलत होते.

तसेच 18 होल इंटरनॅशनल खारघर व्हॅली गोल्फ कोर्स आणि सेंटर ऑफ एक्सलन्स येथे व्ह्यूअर गॅलरीचे उद्घाटन आणि इर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विमानाचे यशस्वी लँडिंग आणि फ्लायपास्ट केल्याबद्दल सिडको आणि इतर संबंधितांचे अभिनंदन केले.

सिडकोच्या NMIA आणि NAINA सिटी प्रकल्पांमध्ये MMR च्या आर्थिक विकासाला चालना देण्याची आणि महाराष्ट्राला देशाचे पॉवरहाऊस बनवण्याची क्षमता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच इर्शाळवाडीतील भूस्खलनग्रस्तांना जास्त विलंब न लावता वेळेत घरे बांधून सिडकोने मानवतेचे मूल्य जपले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भूस्खलनग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या. सिडकोत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती झालेल्या भूस्खलनग्रस्तांनाही त्यांनी नियुक्तीपत्रे दिली. यावेळी त्यांनी सिडकोच्या प्रकल्पांची माहिती देणारे सिडको कॉफी टेबल बुकही लॉन्च केले.



हेही वाचा

MSRTC कडून दिवाळीपूर्वी प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा