Advertisement

मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट

आता अवघ्या 2 तासात मुंबई-पुणे हे अंतर कापता येणार आहे... जाणून घ्या कसं?

मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट
SHARES

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी अटल सेतू (Atal Setu) या समुद्री पुलाजवळ 14 लेन रस्ता बनवण्याबाबतची घोषणा केली होती.

सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, 'नवीन महामार्ग पुण्याला रिंग रोडने जोडला जाईल आणि पुढे बेंगळुरूपर्यंत विस्तारेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड रहदारी आहे. अटल सेतूजवळ 14 लेन रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला रिंग रोडने आणि नंतर बेंगळुरूला जोडला जाईल. या रस्त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक 50 टक्क्याने कमी होईल.'

नवीन महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. त्याचसोबत यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (Mumbai-Pune Express Way) वाहनांची गर्दी लक्षणीयरित्या कमी होईल. या नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरूला जाणं अतिशय सोपं होणार आहे.

अटल सेतू आता द्रुतगती महामार्गाद्वारे सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. म्हणजेच अटल सेतूवरून खाली उतरल्यानंतर 14 लेन रस्ता तयार केला जाणार आहे. हा महामार्ग थेट बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणार आहे. 

यासोबत हा रस्ता पुणे रिंग रोडशी कनेक्ट केला जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे सातारा आणि सोलापूरला जाणं देखील सोपं होणार आहे. या नव्या महामार्गासाठी जवळपास 17 हजार कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.

Advertisement

मुंबई - पुणे प्रवास सुसाट

नव्या द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा कालावधी आणखी कमी होणार आहे. अवघ्या दोन तासांमध्ये तुम्हाला मुंबईवरून पुणे गाठता येण्याची शक्यता आहे. 

मुंबई - पुणे प्रवासासाठी सध्या साडेतीन तासांचा वेळे लागतो. पण या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये सव्वा ते दीड तासांची बचत होणार आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील एका अधिकाऱ्यांने दिली आहे. 

असा असेल नवा महामार्ग

या महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी हे डायरेक्ट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. 130 किलोमीटर लांबीचा हा सुपरफास्त द्रुतगती महामार्ग असणार आहे. हा महामार्ग थेट चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असणार आहे.

Advertisement

या महामार्गावर वेगवान प्रवासासाठी 8 लेन असणार आहेत. या रस्त्याच्या बांधणीसाठी अंदाजे 17,500 कोटी रुपयांचा खर्च होईल. सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या नव्या महामार्गाची रुपरेषा तयार केली जात आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर त्याचा प्रवाशांना चांगला फायदा होईल.



हेही वाचा

सप्टेंबर अखेरपर्यंत ठाणे खाडी पूल-3 खुला होणार

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरील रस्त्याचा काही भाग खचला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा