Advertisement

जोगेश्वरीत वाचकांसाठी नवी 'प्रेरणा'


जोगेश्वरीत वाचकांसाठी नवी 'प्रेरणा'
SHARES

जोगेश्वरी - शिवटेकडी परिसरात नवीन 'प्रेरणा' वाचनालय उभारण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी रूपाली भालके यांच्या हस्ते झाले. रामवाडी परिसरात पहिले वाचनालय होते. पण जागेच्या अडचणीमुळे हे वाचनालय शिवटेकडीतल्या मजासगाव रहिवासी संघाच्या कार्यालयात नव्याने सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयात जवळपास साडेपाच हजार पुस्तके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलापासून ते जेष्ठ नागरिकांसाठी सुद्धा पुस्तके उपलब्ध आहेत. या प्रेरणा वाचनालयासाठी उपदेश पांचाळ, शैलेश नसरे, प्रफुल्ल शिवगण, पुष्पा मोरे यांनी मेहनत घेतली. वाचनालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सिटीसर्वे विभागाचे अधिकारी अमोल पवार, पाणी हक्क समितीचे सीताराम शेलार उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा