Advertisement

मेट्रो ३ भुयारी प्रकल्पाच्या कामाला गती

कुलाबा-वांद्रे-सिप्झ भुयारी मेट्रो प्रकल्प ३ च्या कामाला चांगलीच गती मिळाली आहे.

मेट्रो ३ भुयारी प्रकल्पाच्या कामाला गती
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ भुयारी मेट्रो प्रकल्प ३ च्या कामाला चांगलीच गती मिळाली आहे. नुकताच मेट्रो ३ मार्गावरील दक्षिणेकडील आठवं स्थानक असलेलं ग्रँट रोड स्थानकाचं काम जोरात सुरू आहे. या स्थानकाचं २२ टक्के काम पूर्ण झालं असून, या स्थानकामुळं पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड उपनगरीय रेल्वे स्थानकाला थेट जोडलं जाणार आहे. ग्रँट रोड हे स्थानक कट आणि कव्हर आणि नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (एन. ए. टी. एम.) तंत्रज्ञानाद्वारे बांधलं जाणार आहे. ग्रँट रोड स्थानक २०२ मीटर लांबीचे, १७ मीटर रुंद आणि भूपातळी पासून सुमारे २७ मीटर खोलवर आहे.

सध्यस्थितीत ग्रँट रोड मेट्रो स्थानकाचं सिकेन्ट पाईलिंग पूर्ण झालं असून, खोदकामाला सुरुवात झाली आहे. तसंच, जलवाहिन्या, गटार वाहिन्या आणि बेस्ट विद्युत केबल्ससारख्या प्रमुख पायाभूत सुविधांच्या वाहिन्यांना आधार देण्याचं काम सुरू आहे. स्थानकाच्या खोदकामासोबतच स्थानकानजीकच्या इमारतींना आधार देण्यासाठी स्ट्रॅटस आणि वॉलर्स उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शिवाय, स्थानकाच्या बेस स्लॅबचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. ग्रँट रोड मेट्रो स्टेशनमध्ये ४० टन क्षमतेची एक क्रेन आणि एक जेसीबी सोबत एक हायड्रा, एक टेंशन पाइल मशीन, एक इलेक्ट्रिक कंप्रेसर, ४० टन क्षमतेची दोन गॅन्ट्री क्रेन आहेत. ग्रँट रोड स्थानकाच्या बांधकामासाठी एकूण १९१ अधिकारी, कर्मचारी व कामगाराची फौज तैनात करण्यात आली आहे.

Advertisement

मेट्रो प्रकल्प ३ चे आतापर्यंत एकूण ९३ टक्के भुयारीकरण व ६४ टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. तसंच, सर्व स्थानकांचं काम प्रगतीपथावर आहे. ग्रँट रोड मेट्रो स्थानकामुळं पचिम रेल्वेचे ग्रँट रोड स्थानक, बाबुलनाथ मंदिर, रिलायन्स रुग्णालय, ऑगस्ट क्रांती मैदान, कमला नेहरू पार्क, मणीभवन, भारतीय विद्या भवन यांना महत्वाच्या ठिकाणांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा