Advertisement

उत्पादनशुल्क विभागाचा 'झिंगाट' निर्णय, दारूपार्टीसाठी मिळेल आॅनलाईन परवानगी

यंदा थर्टी फर्स्टच्या दारूपार्टीसाठी परवानगी घेण्याकरीता पार्टी आयोजकांना उत्पादन शुल्क विभागाच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही. कारण दारूपार्टीसाठी आॅनलाईन परवानगी देण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतल्याची माहिती सुनील चव्हाण, संचालक (अंमलबजावणी आणि दक्षता), उत्पादन शुल्क यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

उत्पादनशुल्क विभागाचा 'झिंगाट' निर्णय, दारूपार्टीसाठी मिळेल आॅनलाईन परवानगी
SHARES

'न्यू इयर' च्या दारू पार्ट्यांचं प्लानिंग करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. यंदा थर्टी फर्स्टच्या दारूपार्टीसाठी परवानगी घेण्याकरीता पार्टी आयोजकांना उत्पादन शुल्क विभागाच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही. कारण दारूपार्टीसाठी आॅनलाईन परवानगी देण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतल्याची माहिती सुनील चव्हाण, संचालक (अंमलबजावणी आणि दक्षता), उत्पादन शुल्क यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


परवानगी बंधनकारक

दारूबंदी कायद्यानुसार दारू पिण्यासाठी तसेच दारूपार्ट्या आयोजित करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जिथे कुठे पार्टी आयोजित करायची आहे तिथे अन्न आणि दारूचा समावेशासाठी परवानगी आवश्यक असते. अन्नपदार्थांसाठी अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)कडून परवानगी घ्यावी लागते. तर दारूसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घ्यावी लागते.



अन्यथा, कडक कारवाई

अशी परवानगी न घेता जेवणावळी घातल्या आणि दारू रिचवली तर एफडीएसह उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाते. अगदी गुन्हा नोंदवत तुरूंगाची हवाही खावी लागते. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी बार अॅन्ड रेस्टाॅरन्ट वगळता जिथे कुठे दारूपार्टी आयोजित करायची असेल, तेथे दारूपार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी आवश्यक असेल. शिवाय यंदा अशा पार्ट्यांवर उत्पादन शुल्काची करडी नजर असणार आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या तावडीत सापडल्यास दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत चव्हाण यांनी दिले.


साॅफ्टवेअरची चाचणी

आतापर्यंत अशी परवानगी घेण्यासाठी आयोजकांना आवश्यक कागदपत्रे जोडत एक अर्ज उत्पादन शुल्क विभागाला सादर करावा लागत होता. परवनागी मिळवण्यासाठी पाठपुरावाही करावा लगत होता. मात्र आॅनलाईन यंत्रणेमुळे ही कटकट वाचणार आहे. त्यासंदर्भातील साॅफ्टवेअरची सध्या चाचणी सुरू आहे. येत्या दोन दिवसांत आॅनलाईन परवानगी देण्यास सुरूवात होईल, असं उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केलं


कसा कराल अर्ज?

उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परवानगीसाठीचा अर्ज उपलब्ध असेल. हा अर्ज भरून त्यासोबत आधारकार्डसह अन्य कागदपत्र जोडावे लागतील. त्यानंतर या अर्जाची छाननी होऊन उत्पादन शुल्क विभाग आॅनलाईन परवानगी देण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे ही आॅनलाईन सेवा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा