Advertisement

हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून असा करा बचाव


हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून असा करा बचाव
SHARES

हिवाळ्यात पायांना भेगा पडल्यास बऱ्याच वेदना होतात. पायांचं सौंदर्यदेखील यामुळे नष्ट होतं. पण काही घरगुती उपायानं भेगांवर तुम्ही उपाय करू शकता. याशिवाय हिवाळ्यात पायांची कशी काळजी घ्याल याची माहिती देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) झोपताना पाय स्वच्छ धुवावेत आणि मॉईश्चराईज्ड क्रिम लावावे. यामुळे भेगांचा त्रास कमी होतो.

२) कडूलिंबाचा पाला वाटून त्याचा रस काढून पायांना लावावा. त्यामुळे भेगा कमी होतात.

३) लोणी, आंबाहळद आणि मीठ यांचं मिश्रण करून रोज पायांना लावल्यास आराम मिळतो.

४) बोरिक पावडर, जैतून तेल आणि व्हॅसलिन एकत्र करून भेगांमध्ये भरल्यास त्रास कमी होतो.

५) हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही त्रास कमी होतो.

६) चंदन उगळून भेगांमध्ये त्याचा लेप लावल्यानं भेगा कमी होतात.

७) ग्लिसरीन, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना लावून मालीश करावं. यामुळे देखील भेगांच्या समस्येतून मुक्ती होईल.

८) आंघोळ झाल्यावर मोहरीच्या तेलामध्ये थोडी हळद घालून भेगांवर लावणं फायदेशीर ठरेल.

९) मधाच्या पोळ्यातील ताजे मेण काढून वितळवून त्यात बोरीक पावडर मिसळून टाचांच्या भेगांवर लावणं. यामुळे भेगा बंद होतील.


हेही वाचा -

नो शेव्ह नोव्हेंबर पाळताय? मग या दाढीच्या स्टाईल्स नक्की ट्राय करा

दोरीच्या उड्या मारा आणि झटपट वजन कमी करा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा