Advertisement

जोगेश्वरीत होणार नवं उद्यान


जोगेश्वरीत होणार नवं उद्यान
SHARES

मुंबई - पालिका निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम उपनगरात एक नवं उद्यान विकसित करण्यात येणार आहे. आणि यासाठी सुमारे 3 कोटी 17 लाख रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाचे काम 15 महिन्यांत पूर्ण होणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील कमालीस्तान स्टुडीओच्या बाजूला पालिकेचं वेरावली जलाशय आहे. या जलाशयाच्या विकासाबरोबरच जलाशयाच्या बाजूला उद्यान विकसित करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त रमेश बांबळे यांनी दिलीय. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

असे असेल हे उद्यान

7 हजार 708 चौ.मी जागेवर विकसित होणार उद्यान

यातील 6 हजार 597 परिसर हरित क्षेत्र म्हणून विकसित

आकर्षक रंगसंगतीचे दगड वापरून पायवाट

पायवाटांच्या दोन्ही बाजूस फुलझाडे

झरा ओलांडण्यासाठी पूल

अशोक, करंजीसारखी झाडे लावणार

पर्यटकांसाठी सर्व सोयी-सुविधा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा