Advertisement

ऑनलाईन डेटिंग करताय? मग या ७ गोष्टी लक्षात ठेवा


ऑनलाईन डेटिंग करताय? मग या ७ गोष्टी लक्षात ठेवा
SHARES

ऑनलाईन डेटिंग ही आजकल अतिशय कॉमन गोष्ट आहे. फेसबुक, मॅसेंजर आणि टिंडर अशा अनेक साईट्सवर तरूण-तरूणींची ओळख होते. सिंगल असलेले कधी टाईमपास म्हणून तर लग्न करायचं म्हणून ऑनलाईन डेटिंग करताना दिसतात. एखाद्या व्यक्तीशी ऑनलाईन ओळख झाली की आपण त्याचं फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर चेक करतो. 


यावरून त्या व्यक्तीविषयी आपल्याला माहिती मिळते. पण या माहितीमध्ये किती तथ्य असतं हे न पडताळता त्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवतो. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीला समोरा-समोर भेटल्यावर आपण फसवलं गेल्याचं लक्षात येतं. अनेकदा ऑनलाईन डेटिंग करताना देखील अार्थिकदृष्ट्या गंडवलं गेल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज ऑनलाईन डेटिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगणार आहोत.

१) तुम्ही ऑनलाईन डेटिंग करताना काळजी घेणं फार आवश्यक आहे. तुम्ही समोरील व्यक्तीच्या कितीही प्रेमात असलात तरी त्याच्यासोबत खाजगी गोष्टी शेअर करू नका. घरचा पत्ता, फोन नंबर, बँकेचा अकाऊंट नंबर अशी माहिती द्यायची घाई करू नका. काही महिने सुरक्षीत अंतर ठेवूनच चॅट करा.

२) जोपर्यंत समोरच्याबरोबर चांगली ओळख होत नाही तोपर्यंत त्यासोबत कुठल्याही प्रकारचे फोटो शेअर करू नका. तुमचे फोटो मॉफ करून वापरले जाऊ शकतात. किंवा त्याचा आणखी काही गैरवापर केला जाऊ शकतो.

३) ऑनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीशी सुरुवातीलाच भेटायला जाऊ नका. काही दिवस जाऊदेत. मग तुम्ही भेटू शकता. पण भेटायचं ठरलं तरी सार्वजनीक जागाच निवडावी. याशिवाय सोबत जाताना एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला सोबत घेऊन जावे.

४) ऑनलाईन डेटिंग करताना एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास ही माहिती काढून देण्याचं काम करणाऱ्या काही कंपन्या आहेत. असा व्यावसायिक कंपन्यांकडून योग्य ती माहिती काढून घ्यावी.

५) आपण ज्या व्यक्तीशी संपर्कात आहोत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे देखील तपासून घ्यावं.


६) ऑनलाईन डेटिंग करताना समोरचा व्यक्ती काही गोष्टी लपवण्याची शक्यता असते. आदी लग्न झालं आहे, मुलं आहेत या गोष्टी सांगणं टाळलं जातं. फक्त टाईमपास म्हणून असले उद्योग केले जातात. आधी योग्य ती खात्री करूनच डेटिंग करायचं की नाही याचा निर्णय घ्यायचा.

७) अनेकजण ऑनलाईन डेटिंग करताना लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण लग्नानंतर समोरच्या व्यक्तीनं फसवल्याचं समोर येतं. त्यामुळे लग्नाचा निर्णय घाईत घेऊ नका. सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि पडताळूनच लग्नाचा निर्णय घ्यावा.



हेही वाचा

'या' नावाजलेल्या कंपनीच्या लोगोमध्ये दडलेत अनेक अर्थ




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा