Advertisement

अंडे का फंडा : अशी ओळखा बनावट अंडी

साधारण अंड्यासारखीच बनावट अंडी दिसतात. त्यामुळे खऱ्या आणि बनावटी अंड्यांमधला फरक ओळखणं फार कठीणच आहे. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे बनावटी अंडी ओळखणं सहज शक्य आहे.

अंडे का फंडा : अशी ओळखा बनावट अंडी
SHARES

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... रोजच्या आहारात एक तरी अंडे खावंच, असं अनेक जाणकारांचं म्हणणं असतं. कारण अंडे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अंड्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे अधिक असतं. त्यामुळे अंड्याचे फायदे अनेक आहेत. पण भरपूर प्रोटीन घेण्याच्या नादात आपण बनावटी अंडी तर खात नाही ना? याचा विचार केला पाहिजे.

साधारण अंड्यासारखीच ही बनावट अंडी दिसतात. त्यामुळे खऱ्या आणि बनावटी अंड्यांमधला फरक ओळखणं फार कठीणच आहे. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे बनावटी अंडी ओळखणं सहज शक्य आहे.


कशी बनतात बनावट अंडी?

बनावट अंड्यांचा बाहेरचा भाग हा कॅल्शियम कार्बोनेट, पॅराफिन वॅक्स आणि जिप्सम पावडर यापासून तयार करतात. तर आतील पांढरा बलक सोडियम अल्जिनेट, तुरटी जिलेटीन, एडिबल कॅल्शियम क्लोराईड, बेंझॉइक अॅसिड, पाणी आणि खाण्याचा रंग यापासून बनवला जातो. बनावट अंड्यांच्या सेवनानं मेटाबॉलिजमची समस्या निर्माण होते. तसंच मेंदू आणि मज्जातंतूच्या पेशींची हानी होते.


कशी ओळखाल बनावट अंडी?

१) खऱ्या अंड्याचा वरचा भाग म्हणजे टरफल जास्त चकाकत नाही तर बनावट अंड्याचा बाहेरचा भाग चांगला चकाकतो.

२) खऱ्या अंड्याचं टरफल हे थोडे खडबडीत असते तर बनावट अंड्याचं टरफल हे अत्यंत गुळगुळीत असतं.

३) बनावटी अंड्यांचे टरफल जर तुम्ही आगीच्या संपर्कात आणले तर ते लवकर आग पकडतात. कारण ते प्लास्टिकसारख्या पदार्थापासून बनवलेले असतात. खऱ्या अंड्याचे टरफल आग पकडत नाही. आगीत टाकताच ते काही वेळात काळे होऊन जातात.

४) अंडे फोडण्याआधी ते हलवून बघा. जर तुम्हाला आतून पाण्याचा आवाज आला तर ते अंडे बनावट आहे. खऱ्या अंड्यातून असा कुठलाच आवाज येत नाही.

५) अंडे फोडल्यानंतर त्यातील पिवळा आणि पांढरा बलक तव्यावर एकत्र झालेला दिसला तर अंडे बनावट आहे हे ओळखा. कारण एकाच पदार्थातून अंडी कृत्रिमरित्या तयार केलेली असतात. अस्सल अंड्याचा पांढरा आणि पिवळा बलक आपण केल्याशिवाय एकत्र होत नाही.



हेही वाचा

रोजच्या आहारात राजगिरा 'असा' ठरू शकतो फायदेशीर




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा