Advertisement

'सायकल' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?


'सायकल' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
SHARES

हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांची मुख्य भूमिका असलेला सायकल हा एक हलका फुलका चित्रपट ४ मे रोजी प्रेक्षकांसमोर येत आहे. कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांनंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता सायकल घेऊन येणार आहेत.


सायकल ही एक भावनाशील आणि मनोवेधक कथा आहे जी विविध भावनांना स्पर्श करते आणि एका खास प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचते. हा सिनेमा तुम्हाला जाणवून देतो की, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आनंद लपलेला असतो आणि तो साजरा करणे महत्वाचा असतो. हॅपी माइंडस एंटरटेनमेंट आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्स सोबत या सिनेमासाठी काम करण्यात मला खूप आनंद मिळाला आहे.
- प्रकाश कुंटे, दिग्दर्शक


कथा ऐकल्यानंतर एका मिनिटात हा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने देखील याला संमंती दर्शवली. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला, कारण त्यांनीसुध्दा सिनेमा पाहिल्यानंतर एका मिनिटात करार करण्याचा निर्णय घेतला. 'चांगुलपणाचा' संदेश देणारी अशी या सिनेमाची कथा असून प्रेक्षकांना नक्कीच मोहित करेल असा आम्हाला विश्वास आहे.
- संग्राम सुर्वे, निर्माता

सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकलवर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्र केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. केशवच्या गावात आलेल्या दोन अज्ञात व्यक्ती ही सायकल चोरतात. केशवला त्याची सायकल परत मिळते का? चोरांनी सायकल का चोरली आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सायकल हा सिनेमा बघावा लागेल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा