सँडहर्स्ट रोड - भाजपा सरकार मागील 20 वर्षात फक्त सामान्य नागरिकांची पिळवणूक करत आहे, तर काँग्रेस नेहमीच गरीबांच्या भावनांशी खेळत आली आहे, अशी टीका समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी केली. इमामवाडा भागात शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
भाजपा सरकारने केलेल्या गोवंश हत्याबंदीचा सकारात्मक प्रतिसाद अजूनही कुठे दिसत नाही, भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष मतांचे राजकारण करत असल्याचीही टीका त्यांनी केली. या सभेला 300 हून अधिक नागरिक उपस्थित होते. या वेळी वॉर्ड 223 मधील सपाच्या उमेदवार डॉ. निइदा फातीमा यांच्या प्रचारासाठी अबू आझमी आले होते.