Advertisement

'युतीसाठी भाजपा सकारात्मक'


'युतीसाठी भाजपा सकारात्मक'
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपा नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर सुरु झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजपा नेते हजर राहिले. सोमवारी भाजपाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युतीसाठी सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा भाजपाने यासंदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपा युतीसाठी सकारात्मक असल्याची माहिती दिली. युतीसाठी शिवसेनेला चर्चेसाठी निमंत्रण देणार आहे. भाजपा-शिवसेना युतीमध्ये पारदर्शकता असावी. जागेबाबत सार्वजनिक चर्चा अयोग्य आहे. शिवसेनेशी आजपासून युतीबाबत चर्चा सुरु करणार आहे. आशिष शेलार आणि अन्य दोन नेते भाजपाकडून चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा