सीएसटी- कोल्ड प्ले कॉन्सर्टवर निवडणूक आचार संहिता लागू करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त जे.के. सहारिया यांच्याकडे दिलंय. ग्लोबल सिटीजन इंडिया आणि महाराष्ट्र शासनातर्फे हा कॉन्सर्ट आयोजित करण्यात येणाराय. राजकीय व्यासपीठ म्हणून त्याचा वापर होणार असल्यामुळे उपस्थितांच्या भाषणावर बंदी आणावी, अशी मागणी निरुपम यांनी केलीय.
या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत माजी आमदार चरण सिंग सपरा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर, उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह, सचिव शिवकुमार लाड, राजेंद्र पवार, बृजमोहन शर्मा आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.