महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा (Raj Thackeray Rally in Aurangabad) होणार आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटींसह परवानगी दिली आहे. मात्र, भीम आर्मीने (Bhim Army) राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
भीम आर्मीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे होणारी जाहीर सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीसानी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनानं १६ अटी दिल्या आहे. त्या अटींचे उल्लंघन झाल्यास भीम आर्मीकडून महापुरुषांच्या नावाच्या घोषणा सभेच्या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी दिली आहे.
सभास्थळी आसनमर्यादा ही 15 हजार इतकी आहे. त्यामुळे 15 हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरलं जाईल.
सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळथ असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
कार्यक्रमवेळी कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये आणि त्यांचं प्रदर्शन करु नये.
स्वयंसेवक नेमण्यात यावे. त्यांची नावे, मोबाईल नंबर पोलिसांना द्यावे. तसेच कोणत्या गावातून किती नागरीक येणार, त्यांची संख्या आणि त्यांच्या वाहनांचा प्रवासाचा मार्ग विषयी माहिती पोलिसांना द्यावी.
हेही वाचा