Advertisement

भाजपा नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण
SHARES

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शेलार यांनी बुधवारी रात्री उशिरा ट्विटरवरून आपला कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती दिली.

शेलार यांनी म्हटलं की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे.

याशिवाय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, राज्यात मागील तीन दिवसांपासून ५० हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ५८ हजार ९५२ रुग्ण आढळले. तर २७८ मृतांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांचा आकडा ३५ लाख ७८ हजार १६० झाला आहे. यामध्ये ६ लाख १२ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा