Advertisement

केंद्राच्या जीवावर कर्जमाफीची घोषणा केली का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

शिवसेनेने काँग्रेससोबत जाण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता का? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.

केंद्राच्या जीवावर कर्जमाफीची घोषणा केली का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
SHARES

राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं. त्यामुळे हे हाराकिरीचं सरकार आहे. शिवसेनेने काँग्रेससोबत जाण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता का? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.

हेही वाचा- नागपूर हिवाळी अधिवेशात आमदार आले मुद्द्यांवरून गुद्द्यांवर

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत फडणवीस यांनी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मिळून केलेली सत्तास्थापना आणि शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राज्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या. १९९० नंतर भाजपला दोनदा १०० हून अधिक जागा मिळाल्या. पण शिवसेनेने ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. त्यांच्यासोबतच हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. त्यामुळे हे हाराकिरीचं सरकार आहे, असं फडणवीस म्हणाले.

मी आधी सामना वाचत नव्हतो. परंतु आता सामनाचं सबस्क्रिप्शन लावलं आहे. सामनच्या अग्रलेखात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कुठल्या शब्दांत टीका केली होती. काँग्रेसबाबत काय काय म्हटलं होतं. हे साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. तरीही त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, असं म्हणत फडणवीस यांनी अग्रलेखातले उतारेच सभागृहात वाचून दाखवले. यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. 

हेही वाचा- छीन के लेंगे आझादी… मान्य आहे का? फडणवीसांनी विचारला मुख्यमंत्र्यांना प्रश्न

शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला फटकारताना फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरडवाहून शेतीला हेक्टरी २५ हजार रुपये, तर बागायती शेतीला हेक्टरी ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. तुम्ही केंद्र सरकारकडे मदत मागितल्याचं आता सांगत आहात, पण ही घोषणा तुम्ही केंद्राच्या जीवावर केली होती का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.  

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा