शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, अलिबागमधील १९ घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसंच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे.
बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जर लिहून दिलं की असं केलेलं नाही तर एक नाही दोन जोडे मारा. मी माझे जोडे संजय राऊतांना देतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या पायातील जोडे हातात घेऊन दाखवले.
यावेळी त्यांनी अलिबागमधील १९ बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
त्यांनी म्हटलं की, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत. माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. १९ बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले.
२०१३ ते २०२१ या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले.
यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२०ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला.
हेही वाचा