Advertisement

उमेदवारीसाठी भाजपचे नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले

गावित आणि तरे यांनी प्रवेश करताच शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर केली.

उमेदवारीसाठी भाजपचे नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले
SHARES

मतदारसंघातील जागा मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून शिवसेनेत (शिंदे) (shiv sena) प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.

पालघरमधील भाजपचे माजी खासदार राजेंद्र गावित (rajendra gavit), भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे (raosaheb danve) यांच्या कन्या संजना जाधव (sanjana jadhav) आणि बोईसरचे (boisar) माजी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गावित आणि तरे यांनी प्रवेश करताच शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर केली गेली. काही दिवसांपूर्वी भाजप (bjp) नेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कुडाळमधून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेल्या जागांकडे भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते भाजप सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

पालघरचे (palghar) माजी खासदार राजेंद्र गावित, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

पालघरमधून राजेंद्र गावित, बोईसरमधून विलास तरे यांची घोषणा करण्यात आली. संजना जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांची उमेदवारी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात भाजप नेते संतोष शेट्टी यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.



हेही वाचा

मेट्रो 3 लाईनवर Airtel पुरवणार पहिली 5G कनेक्टिव्हिटी सेवा

बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणे आणि विरार स्थानकांचा विकास होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा