Advertisement

काय असेल भाजपाच्या जाहीरनाम्यात?


काय असेल भाजपाच्या जाहीरनाम्यात?
SHARES

मुंबई - शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर भाजपाकडूनही आमचा जाहीरनामा तयार असल्याचे सांगितले जात आहे. युतीसंदर्भात निर्णय झाल्यानंतर हा जाहीरनामा जाहीर करण्यात येईल. 2012 साली या दोन्ही पक्षांमध्ये युती होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचा एकत्र वचननामा जाहीर करण्यात आला होता. मात्र आता दोन्ही पक्षांच्या युतीचं घोंगडं भिजत पडल्यामुळे शिवसेनेने आपला वचननामा आधीच घोषित केलाय. मात्र भाजपाच्या सूत्रांकडून असं सांगण्यात येतंय की, भाजपाचा वचननामा अंदाजे 24 पानांचा असण्याची शक्यता आहे.
त्यात शिवसेनेच्या वचननाम्यामधील काही योजना भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाहीरनाम्याच्या योजनांची पळवापळवी सुरु झाली की काय असे मुंबईकरांना वाटू शकते. त्यामुळे आता वचननाम्यांमध्येही श्रेयवाद सुरु होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई लाईव्हकडे भाजपाच्या जाहिरनाम्यामध्ये काय असेल याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपाच्या वचननाम्यात या बाबी असण्याची शक्यता

  • मुंबईमध्ये सीसीटीव्ही आणि वायफाय बसवणार
  • संपूर्ण मुंबईमध्ये एलईडी बल्ब लावण्यात येणार
  • मुंबईमध्ये पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार
  • डॉ. अब्दुल कलाम शैक्षणिक विज्ञान केंद्र उभारण्यात येणार 
  • 15 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना भोगवाटा प्रमाणपत्र देणार
  • 5000 नवीन फिरती शौचालये बांधणार, राईट टू पी संकल्पना राबवली जाणार, मोबाईल अॅपद्वारे टॉयलेट्स  माहिती मिळणार
  • कोळीवाडे, गावठाण आणि ईस्ट-इंडियन्स वसाहतींचा पुनर्विकास धोरण
  • ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बनवणार 
  • बेस्ट थांब्यावर प्रवासी असताना त्यांना येणाऱ्या बसची माहिती उपलब्ध करुन देणार 
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा