मुंबईतील ताज हाॅटेलला दंडात सवलत देऊन मुंबई शेअर बाजारावर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या मुंबई महापालिकेवर भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. ही तर टाटा, बिर्लांची सेना म्हणून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला शेलार (ashish shelar) यांनी टोला लगावला आहे.
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुलाबा येथील ताज आणि नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले होते. या बंद पदपथांवर ताज हाॅटेलच्या व्यवस्थापनाने झाडाच्या कुंड्या तसंच काही साहित्य ठेवून अतिक्रमण केल्याचं निदर्शनास आल्यावर रस्ते आणि पदपथाच्या व्यावसायिक वापरापोटी महापलिकेने ताज हॉटेलला ८ कोटी ८५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मागील ५ वर्षांपासून या प्रकरणावर वाद सुरू होता. दरम्यानच्या काळात ताजने ६६ लाख रुपये देखील महापलिकेला (bmc) दिले आहेत.
टाटांच्या हाँटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने "बीएसई" वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 4, 2021
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला...
तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???...
वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!
हेही वाचा- तोपर्यंत मनसेशी युती नाही, भाजपचा पुन्हा खुलासा
दरम्यानच्या काळात महापालिकेने ताज हाॅटलचा दंड माफ केला. तर बीएसई ला मात्र दंड भरण्याची सक्ती करण्यात आली. यावरून भाजप (bjp), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं असून, ताज आणि बीएसईला एमसमान वागणूक देण्याची मागणी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
त्यावर व्यक्त होताना, टाटांच्या हाॅटेल ताजला ९ कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने "बीएसई" वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला… तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???...वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
(bjp mla ashish shelar criticized bmc over penalty exemption to taj hotel)