मुंबईतील पोलिसांना शासकीय दरानं स्वत:च्या मालकीचं घर (Home for mumbai police), गिरणी कामगारांना ५०० चौरस फुटांचं घर (home for mill worker) कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत वडाळ्यातील भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी (bjp mla kalidas kolambkar) गेल्या आठवड्यात विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकदिवसीय उपोषण केलं होतं. परंतु कोळंबकर यांचं हे उपोषण म्हणजे नौटंकी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे (congress spokesperson raju waghmare) यांनी केली आहे.
हेही वाचा- मुंबई पोलिसांना स्वत:च्या मालकीचं घर कधी? कालिदास कोळंबकर यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण
अशा मागण्यांसाठी कालिदास कोळंबकर (bjp mla kalidas kolambkar) यांनी विधानभवनाच्या (vidhan bhavan) पायऱ्यांवर बसून एक दिवसांचं लाक्षणिक उपोषण (hunger strike) केलं. या आंदोलनाची दखल घेऊन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी त्यांची भेट घेतली आणि या मागण्याची पूर्तता करण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं.
त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे (congress spokesperson raju waghmare) म्हणाले, नटसम्राट आमदार कालिदास कोळंबकर (bjp mla kalidas kolambkar) सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण करून दुपारी ३ वाजता उपोषणाला बसले होते. मागील ३५ वर्षांपासून ते पोलिसांची मोफत घर मिळवून देण्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. आता ते म्हणत आहेत की पोलिसांना सरकारी भावात घर द्या, सरकारी भावात म्हणजे १ ते १.२५ कोटी रुपयांत घर. एवढे पैसे पोलीस कर्मचारी आणतील कुठून? त्याऐवजी पोलीस वसाहतीत ३० वर्षांपासून राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत घर आणि त्यापेक्षा कमी वर्षे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या नोकरीच्या हिशेबात पैसे घेण्यात यावेत, अशी मागणीही वाघमारे यांनी केली.
हेही वाचा- कालिदास कोळंबकर बनले विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
सोबतच, नायगावच्या बीडीडी चाळीत (naigaon bdd chawl) राहणाऱ्या रहिवाशांना इतर ठिकाणी न पाठवता नायगावमधील ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवावं, अशी मागणी मी करताच कोळंबकर यांनी या रहिवाशांना वरळीतील ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवण्याची मागणी केली. त्यामुळे ही कोळंबकर यांची फक्त नौटंकी सुरू आहे.