शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. पण या शपथविधी सोहळ्यावर विरोधकांनी टीका तर केलीच. पण भाजपच्या काही नेत्यांनी देखील नाराजी वर्तवली आहे.
शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या पुढल्याच मिनीटाला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली.
“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra
तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.
मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. पूजाने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली. पूजासोबत राहणाऱ्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान तिला मृत्यू झाला.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB
भाजपाने थेट संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच आज संजय राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी उघडपणे त्याला विरोध केला आहे.
हेही वाचा