Advertisement

राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक


राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक
SHARES

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष  नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार असून त्याच दिवशी या निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

२१ सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना आमदारकीवरही पाणी सोडलं होतं. १२ वर्षांत काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद आमदारकीचा राजीनामा देताना राणेंनी व्यक्त केली होती. 


७ जुलैपर्यंतच कालावधी

नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएला पाठिंबा जाहीर केला. सभापतींकडे राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा पाठवला होता. विधानपरिषदेच्या या आमदारकीचा कालावधी ७ जुलै २०२२ पर्यंत आहे.


मतदान कार्यक्रम

  • अधिसूचना जारी करण्याची तारीख - २० नोव्हेंबर २०१७
  • नामनिर्देशनाची अंतिम मुदत - २७ नोव्हेंबर २०१७
  • अर्जांची छाननी - २८ नोव्हेंबर २०१७
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - ३० नोव्हेंबर २०१७
  • मतदान - ७ डिसेंबर २०१७ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
  • मतमोजणी - ७ डिसेंबर २०१७ - संध्याकाळी ५ वाजता



हेही वाचा-

…तर ते ‘सहा’ नगरसेवक देतील पदाचे राजीनामे!

'यापुढे आमचे नेते सत्ताधाऱ्यांच्या आवश्यक त्याच कार्यक्रमाला जातील'


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा