Advertisement

“उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी”

चीन सोबत सीमाभागात झालेल्या चकमकीत नरमाईची भूमिका घेतली. परंतु आपल्याच देशातील शेतकऱ्यांविरोधात कठोरपणे वागल्याचा आरोप करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला.

“उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी”
SHARES

चीन सोबत सीमाभागात झालेल्या चकमकीत नरमाईची भूमिका घेतली. परंतु आपल्याच देशातील शेतकऱ्यांविरोधात कठोरपणे वागल्याचा आरोप करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा उल्लेख महाराष्ट्राचे राहुल गांधी असा केला.

"चीनसमोर पळ काढे" असं निलाजरं विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी... जनता या 'राहुल गांधीगिरी'चा समाचार घेईलच, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रत्येक मुद्द्याचा चांगलाच समाचार घेतला होता.

हेही वाचा- जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चिट

“आपल्याकडच्या शेतकऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. वीजेबद्दलचा निर्णय आपण कालच घेतला आहे. पण, जे शेतकरी तिकडं आंदोलन करत आहेत. त्यांची वीज कापली जाते. त्यांची शौचालये तोडली जात आहेत. पाणी बंद केलं जात आहे. इतकंच नाही, तर ते देशाच्या राजधानी येऊ नयेत म्हणून त्यांच्या वाटेत खिळे टाकले जात आहेत. ज्या तारांचं कुंपण सीमेवर असायला हवं ते त्यांच्या वाटेत टाकलं जातं. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे. 

तिकडे काहीच नाही. हा बंदोबस्त सीमेवर केला असता, चीन देशाच्या हद्दीत घुसला नसता. शेतकरी अतिरेकी आहेत का? असं समजू नका की, देश ही तुमची खासगी मालमत्ता आहे. शेतकऱ्यांची सुद्धा मालमता आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

(cm uddhav thackeray is rahul gandhi of maharashtra says bjp mla atul bhatkhalkar)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा