Advertisement

'भारत बंद' १०० टक्के यशस्वी करणार- निरूपम

काँग्रेसने पुकारलेला देशव्यापी 'भारत बंद' नक्कीच यशस्वी होईल. त्यामुळे १० सप्टेंबरला कुणीही घराबाहेर न पडता आमच्या 'भारत बंद'ला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संजय निरूपम यांनी केलं.

'भारत बंद' १०० टक्के यशस्वी करणार- निरूपम
SHARES

भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरांमधील केलेल्या भरमसाठ दरवाढीविरोधात आणि प्रचंड वाढलेल्या महागाई विरोधात येत्या सोमवारी काँग्रेसने 'भारत बंद' पुकारला आहे. हा 'भारत बंद' १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


कुठले पक्ष सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (शरद यादव), CPI, CPI (M), PWP, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई (जोगेंद्र कवाडे गट), राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष अशा सर्व भाजपाविरोधी पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. तसंच सर्व संलग्न कामगार संघटनांनी देखील भारत बंदला समर्थन दिलं आहे. बँक युनियनचा पाठिंबा असल्याने बँका, इन्शुरन्स कंपनी, पेट्रोल पंप असोसिएशन, आहार संघटना आणि मुंबईतील २७ मोठ्या मार्केटचा पाठिंबा या बंदला राहिल, असंही निरूपम म्हणाले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि महिला अध्यक्षा डॉ. अजंता यादव उपस्थित होते.


देशातील सर्वात महार्ग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा परिणाम महागाईवर होत असून सर्वसामान्य महागाईने त्रस्त झाले आहेत. सर्वसामान्यांवर एक्साईज ड्युटी, कृषी कल्याण सेस, दुष्काळ सेस असे २७ ते २८ टक्के कर लावून सरकारने ११ लाख कोटी रुपये कमावले आहेत. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असताना हे सरकार दुष्काळाचा कर घेत आहे. त्यामुळे १० सप्टेंबरला कुणीही घराबाहेर न पडता आमच्या 'भारत बंद'ला पाठिंबा द्यावा, असं मी सर्वसामान्यांना आवाहन करत आहे.
- संजय निरूपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस



हेही वाचा-

'यही है अच्छे दिन'! सेनेचा भाजपवर बाण

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, १० सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा