Advertisement

राहुल-उद्धव यांच्यात ‘फोन पे चर्चा’, एकमेकांना दिलं 'हे' आश्वासन...

काँग्रेसच्या नाराज नेत्यांना गळाशी लावून भाजप महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

राहुल-उद्धव यांच्यात ‘फोन पे चर्चा’, एकमेकांना दिलं 'हे' आश्वासन...
SHARES

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (maha vikas aghadi government) काँग्रेस पक्ष सहभागी असला, कोरोना संकटाच्या काळात या सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असला, तरी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसचा सहभाग नाही, असं वक्तव्य करून महाराष्ट्र काँग्रेसची नाराजी अप्रत्यक्षरित्या दर्शवणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल यांधी यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (telephonic conversation between uddhav thackeray and rahul gandhi) यांनी बुधवार २७ मे रोजी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर आघाडीतल्या मित्रपक्षांमधील तणाव निवळल्याचं म्हटलं जात आहे.

भेटीगाठींनी चर्चांना उत

मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात लहानमोठ्या घडामोडी सुरू आहेत. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कही लावले जात आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोनवरील कथित संभाषणाची आॅडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना खऱ्या अर्थाने उत आला. या संभाषणात एका व्यक्तीला उद्देशून राज्यात आमचं नाही, तर शिवसेनेचं सरकार आहे, असं चव्हाण यांनी वक्तव्य केल्याचं म्हटलं जात होतं. 

हेही वाचा - महाराष्ट्रात काँग्रेस डिसिजन मेकर नाही- राहुल गांधी

त्या पाठोपाठ काँग्रेसच्या नाराज नेत्यांना गळाशी लावून भाजप महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याच्याही वावड्या उठल्या. एका बाजूला या चर्चा सुरू असताना आधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट मातोश्री निवासस्थानी गेले. तर भाजप खासदार नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यामुळे अफवांनी जोर पकडला. 

काँग्रेसची नाराजी

अशा सर्व घडामोडी घडत असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा सत्तेत असला, तरी तो डिसिजन मेकर नाही, असं वक्तव्य करून अप्रत्यक्षरित्या नाराजी दर्शवली. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील नेत्यांमधील दरी वाढू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २७ मे रोजी वर्षा बंगल्यावर शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या फोनवर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. 

यावेळी फोनवरून बोलताना महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. सरकारच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या म्हणण्याला नेहमीच महत्त्व देण्यात आलं आहे, यापुढंही प्रत्येक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला विश्वासात घेण्यात येईल, असं आश्वासन उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलं. तर काँग्रेसला कोरोना संकटाच्या काळात काँग्रेसचा पाठिंबा राहील, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. या चर्चेनंतर दोन्ही पक्षातील तणाव निवळल्याचं म्हटलं जात आहे.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा