कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर आता कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून, याविरोधात बुधवारी कॉंग्रेस 'मोदी माफी मागो' आंदोलन केलं जाणार असल्याचं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसकडून निषेध केला जात आहे. तसंच, बुधवारी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी म्हणून कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विविध कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे', असं नाना पटोलो यांनी म्हटलं.
'मोदी माफी मागो' आंदोलन
बुधवारी कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. 'मोदी माफी मागो' असं या आंदोलनाचं स्वरूप असल्याचं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी म्हटलं. बुधवारी दुपारी मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोलो यांनी माहिती दिली.
'महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी मत मांडावं'
'मोदींना महाराष्ट्राचा अपमान केला आहे. यावर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नेत्यांनी मत मांडावं', असंही नाना पटोले यांनी म्हटलं. तसंच, 'जे मोदींच्या वक्तव्याचं समर्थन करतीन महाराष्ट्रद्रोही असतील' असंही नाना पटोले यांनी म्हटलं