कोरोना संसर्ग (coronavirus) तसंच लाॅकडाऊनमुळे (lockdown) विविध संकटांचा सामना करत असलेल्या जनतेला सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मदत करताना दिसत आहे. परंतु काही वेळेस संबंधित पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून अनावधानाने, तर काही वेळेस जाणीवपूर्वकपणे या मदतीचा बागुलबुवा होताना दिसतोय. शिवसेनेने केलेल्या मदतीच्या अशाच एका प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (mns leader sandeep deshpande) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
नॅपकीन वाटप
सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळात महिलांना बाहेर पडून सॅनिटरी नॅपकीन खरेदीसाठी बाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. खासकरून कंटेन्मेंट झोनमध्ये तर सर्वच दुकाने बंद असल्याने अडचण वाढली आहे. अशा वेळी मुंबईतील कुलाबा परिसरात युवा सेनेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन (sanitary napkin distribution from shiv sena yuva sena ) वाटण्यात आले. विशेष म्हणजे या सॅनिटरी नॅपकीनच्या पाकिटांवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांना फोटो छापण्यात आला होता. युवती आणि युवा सेनेकडून सॅनिटरी नॅपकीनचं वाटप असं त्यावर नमूद करण्यात आलं होतं. हे फोटो व्हायरल झाल्यानंत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मदतीच्या या जाहीरातबाजीवरून शिवसेनेला सुनावलं आहे.
हेही वाचा- मदतकार्याचे ‘तसे’ फोटो नकोत, राज ठाकरे यांची सूचना
कायरे लाचारानो हे पण आधीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको pic.twitter.com/JyTMJ86eJa
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 21, 2020
आधीच छापले का?
काय रे लाचारांनो, हे पण आधीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको, अशा शब्दांत आपल्या ट्विटर हँडलवरून संदीप देशपांडे व्यक्त झाले आहेत. तर त्याआधी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे फलक लावल्याचं पाहून लाॅकडाऊनच्या काळात शिवसेनेला होर्डिंग कुणी छापून दिलं? यालाच राजकारण म्हणतात, असा टोला लगावला होता.
छायाचित्र काढणं चुकीचं
याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष वेधलं होतं. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्र सैनिकांसोबत सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मनापासून मेहनत घेत आहेत. पण काही मोजके जणं कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणे, ज्याला मदत दिली जात आहे त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणे ह्या चुकीच्या गोष्टी करत आहेत.
आपण ज्याला मदत करतो आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही आहोत का? मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं पण आज प्रसंग बाका आहे त्यामुळे तो नाईलाजाने मदत स्वीकारत आहे, अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्याने देखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हे देखील सुद्धा योग्य आहे का? असा प्रश्न विचारला होता.
हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीतही पुणे पॅटर्न राबवा, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी