Advertisement

प्रवीण दरेकरांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक टळली

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.

प्रवीण दरेकरांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक टळली
SHARES

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयानं (Session Court) मोठा दिलासा दिला आहे.

सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. तसंच, प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला आहे.

प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिकादाखल करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले होते.

आज पुन्हा एकदा या प्रकरणी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज सत्र न्यायालयात सरकारी वकीलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत दरेकर यांना अटक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.

प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

त्या प्रकरणी आम आदमी पक्षानं आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा

आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी’ मतदारसंघात अमित ठाकरे; कोळीवाड्यातील होळीला लावली हजेरी

‘तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात…’; होळीच्या नियमांवरून भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा