Advertisement

'दादर स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर करा'


'दादर स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर करा'
SHARES

सध्या राजकीय पक्षांना लोकांच्या नागरी समस्यांपेक्षा स्थानकांच्या नामकरणातच अधिक रस असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपा सरकारने ओशिवरा स्थानकाचे नाव राम मंदिर केल्यानंतर आता मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यातील निर्धारित दादर पूर्व स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. दादर पूर्व स्थानक विठ्ठल मंदिर स्थानक म्हणून ओळखले जावे, अशी मागणीच काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी एमएमआरडीए आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्याकडे केली आहे.


वडाळ्यातील विठ्ठल मंदिराला यावर्षी 400 वर्ष पूर्ण होत आहेत. संत तुकाराम महाराजांनी स्वतः या मंदिराच्या स्थापनेचा दगड रचला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी 3 ते 4 लाख भाविक या मंदिराला भेट देतात. वर्षभर दररोज हजारो भाविक या मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. प्रति पंढरपूर अशी या मंदिराची ओळख आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिराजवळील मोनो रेल्वेच्या स्थानकाला 'विठ्ठल मंदिर' असे नाव द्यावे अशी भाविकांची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.


- राजू वाघमारे, प्रवक्ते काँग्रेस

या स्थानकांच्या नाववरुनही राजकारण –

  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव देण्याची रामदास आठवलेंची मागणी
  • याच स्थानकाला 'नाना शंकरशेठ' नाव देण्याची शिवसेनेची मागणी
  • दादर रेल्वे स्थानकाचे नाव 'चैत्यभूमी' करण्याची राष्ट्रवादीची मागणी
  • चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नामकरण 'गिरगाव रेल्वे स्थानक' करण्याची शिवसेनेची मागणी
  • एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नामकरण 'प्रभादेवी रेल्वे स्थानक' करण्याची मागणी
  • करी रोड स्थानकाचे नाव 'लालबाग रेल्वे स्थानक' करण्याची मागणी
  • सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव 'डोंगरी रेल्वे स्थानक' करण्याची मागणी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा