Advertisement

भाजपाचे शिरसाट, शेलार सभागृहात परतणार?


भाजपाचे शिरसाट, शेलार सभागृहात परतणार?
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी तीन माजी नगरसेवक महापालिका सभागृहात परतणार आहेत. शिवसेनेकडून पराभूत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांची नामनिर्देशित सदस्यत्वासाठी वर्णी लागली आहे. त्यांच्यानंतर भाजपानेही माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट आणि विनोद शेलार यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच सभागृहातील आवाज वाढलेला पाहायला मिळणार आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 88 आणि भाजपाचे 84 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे संख्याबळानुसार महापालिका सभागृहात जाणाऱ्या पाच नामनिर्देशित सदस्यांपैकी या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि शिवसेना प्रवक्ता अरविंद भोसले यांची वर्णी लावण्यात येत आहे. 

या दोघांचीही नावे शिवसेनेने निश्चित केली आहेत. तर काँग्रेसच्या वतीने सुनील नरसाळे यांचेही नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. मात्र, भाजपाने अद्यापही आपली नावे चिटणीस यांच्यामार्फत महापौरांकडे पाठवलेली नाहीत. परंतु भाजपाकडून दोन माजी नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. भाजपाचे प्रवक्ते असलेले भालचंद्र शिरसाट आणि माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांची नावे चर्चेत आहेत.

महापालिकेत भाजपाने विरोधी पक्षात न बसण्याचा निर्णय घेतला असला तरी सभागृहात शिवसेना विरुद्ध भाजपा असेच चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे सभागृहातील आवाज बुलंद आहेतच. त्यातच विश्वासराव आणि भोसले यांना सभागृहात आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपानेही तोडीस तोड देत शिरसाट आणि विनोद शेलार यांना सभागृहात आणून आपली अटॅकिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या सर्व पाचही नामनिर्देशित सदस्यांची नावे पुढील सभागृहात जाहीर केली जाणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा