आपल्या बिनधास्त बोलण्याने अनेकदा अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी यातून चांगलाच धडा घेतलेला दिसतोय. आता मी एखादं वाक्य बोलताना ५० वेळा विचार करतो, असं खुद्द अजितदादांनीच सांगितलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजितदादांनी हा खुलासा केला. सध्या काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (pwd minister ashok chavan) यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची (maha vikas aghadi) स्थापना किमान समान कार्यक्रमाच्या आधारे (common minimum programme) करण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी राज्याच्या हितासाठी या किमान समान कार्यक्रमावर एकमताने काम करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांचा या सरकारला पाठिंबा असेपर्यंत या सरकारला काहीही होणार नाही. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी काही फरक पडणार नाही.
हेही वाचा- अशोक चव्हाण चुकीचं बोलले- नवाब मलिक
ते पुढं म्हणाले, प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर आपलं वाक्य एक असतं आणि त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. अनेकदा ध चा मा केला जातो. त्यामुळे मी तरी आता काहीही बोलण्याच्या आधी ५० वेळा विचार करतो. सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्या बोलण्यातून शंका-कुशंका निर्माण होणार नाही, वाद निर्माण होणार नाही हे लक्षात घेऊन सर्व गोष्टी तोलूनमापून बोलाव्या लागतात, असंही ते म्हणाले.
तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांचं सरकार सत्तेत आल्यावर भांडणं होतात, हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना ठाऊक होतं, त्यामुळे ते या आघाडीसाठी तयार नव्हत्या. परंतु चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर आम्ही त्यांना आश्वस्त केलं. त्यासाठी महाआघाडीत येताना घटनेनुसारच काम करण्याचं आश्वासन आम्ही शिवसेनेकडून (shiv sena) लिहून घेतलं. सोबतच शिवसेनेने घटनाबाह्य काम केल्यास या सरकारमध्ये राहणार नाही, असं स्पष्टपणे शिवसेनेला सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या चौकटीतच राहून कामं करतील, असं अशोक चव्हाण (ashok chavan) म्हणाले होते.
हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरणाची SIT कडून चौकशी व्हावी, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
यावरून वाद झाल्यावर राज्यात महाविकास आघाडी सरकारची (maha vikas aghadi government) स्थापना ‘किमान समान कार्यक्रमा’च्या (common minimum programme) आधारे झाली आहे. शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेस (congress) अशा तिन्ही पक्षांनी एकमताने या कार्यक्रमाच्या विषयांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कुणी कुणाकडून काहीही लिहून घेतलेलं नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) म्हणाले होते.