फडणवीस सरकार हे स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत आलेल्या सरकारांपैकी सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोटे यांनी भाजप सरकार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. या मुलाखतीत गोटे म्हणाले. गेल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात फडणवीस सरकारने महाराष्ट्राला अक्षरश: ओरबाडून खाल्लं आहे. सरकारी कामात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. शिवस्मारक, समृद्धी महामार्ग या कामांत फडणवीस सरकारने हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. मी पुराव्यांशिवाय कधीही बोलत नाही. या सर्व प्रकणांचा लवकरच खुलासा करण्यात येईल.
फडणवीस यांच्यावर टीका करताना गोटे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द कधीच पाळत नाहीत. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यांच्या खोटारपणाला कंटाळूनच आपण राजीनामा दिल्याचं गोटे म्हणाले.
धुळे शहरातील भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
हेही वाचा-
काश्मीर तोडण्याची भाषा सहन करणार नाही- संजय राऊत
‘फ्री काश्मीर’चं पोस्टर झळकवणारी तरूणी म्हणते…