Advertisement

मुख्यमंत्री खोटी आश्वासनं देतात - आरक्षण कृती समितीचा आरोप

धनगर समाजाच्या अरक्षणबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री बैठक बोलावली होती. या बैठकीला केवळ शिवसेना आणि भाजप धार्जिण्या लोकांना बोलावण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री खोटी आश्वासनं देतात - आरक्षण कृती समितीचा आरोप
SHARES

धनगर समाजाच्या अरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत धनगर कृती समितीच्या प्रतिनिधींना आमंत्रणच नव्हतं. यावरून धनगर कृती समितीचे पदाधिकारी अविनाश पडळकर यांनी मुख्यमंत्री खोटी आश्वासनं देतात. त्यांना धनगर आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवायचा आहे, असा आरोप केला.   

धनगर समाजाच्या अरक्षणबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री बैठक बोलावली होती. या बैठकीला केवळ शिवसेना आणि भाजप धार्जिण्या लोकांना बोलावण्यात आलं होतं. 

बैठक का बोलावली?

सदर बैठकीला 35 प्रतिनिधी उपस्थित होते. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदारही उपस्थित होते. पण राज्यभर आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींना हेतू पुरस्सर डावलल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही. येत्या दोन दिवसात आरक्षण संदर्भातील टिस संस्थेचा अहवाल येणार आहे. हा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बैठक का बोलावली अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सरकार फक्त खोटे अश्वासन देत असून याला धनगर समाज बळी पडणार नाही. लढा तीव्र करण्याबाबत 2 सप्टेंबरला पुण्यात कृती समितीची बैठक होणार असून पुढील दिशा ठरवणार, असल्याचंही पडळकर यांनी सांगितलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा