Advertisement

मुंबईत २ डिसेंबरला भरणार धर्मसभा!

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याकरीता विश्व हिंदू परिषदेतर्फे मुंबईतदेखील धर्म संसदेचं आयोजन करण्यात येत आहे.

मुंबईत २ डिसेंबरला भरणार धर्मसभा!
प्रतिकात्मक फोटो
SHARES

अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेतर्फे मुंबईत देखील २ डिसेंबरला धर्मसभेचं आयोजन करण्यात येत आहे. या धर्मसभेच्या माध्यमातून केंद्र सरकारवर अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी दबाव निर्माण टाकण्यात येणार आहे.


कुठे होणार आयोजन?

या धर्मसभेचं आयोजन वांद्र्यातील बीकेसी ग्राऊंडवर करण्यात येणार आहे. रविवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ही धर्मसभा आयोजित करण्यात येणार आहे. या धर्मसभेत दीड लाखांहून अधिक साधू-महंत सहभागी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


कडेकोट सुरक्षा

महाराष्ट्रातील विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात नुकतीच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत त्यांना धर्मसभेचं निमंत्रण दिलं. सध्या मुंबईत विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने मुंबई पोलिसांकडून या धर्मसभेच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.



हेही वाचा-

राम मंदिर उभारण्याची तारीख सांगा, उद्धव यांचं भाजपाला अल्टिमेटम

राम मंदिरासाठी विधेयक आणा- संजय राऊत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा