Advertisement

युतीची काळजी नको, हिंदुत्व मानणारे सोबत येतील - मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चा सुरूच आहे. शिवसेनेची युतीबाबत संदीग्ध भुमिका असतानाच भाजपा मात्र अजूनही युतीवर ठाम आहे. कारण मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाजपा युतीसाठी आग्रही असल्याचे संकेत दिले आहेत.

युतीची काळजी नको, हिंदुत्व मानणारे सोबत येतील - मुख्यमंत्री
SHARES

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चा सुरूच आहे. शिवसेनेची युतीबाबत संदिग्ध भुमिका असतानाच भाजपा मात्र अजूनही युतीवर ठाम आहे. कारण मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाजपा युतीसाठी आग्रही असल्याचे संकेत दिले आहेत. जालन्यातील भाजपा कार्यकारणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीची काळजी करू नका, हिंदुत्व मानणारे सोबत येतीलचं असं म्हणत हे संकेत दिले आहेत. मात्र त्याचवेळी युतीसाठी भाजपा लाचार नाही असा इशाराही त्यांनी शिवसेनेला यावेळी दिली आहे.


युतीची काळजी करू नका

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात भाजपा कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार असल्यानं मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडेच सर्वांच लक्ष होतं. त्यातही युतीची चर्चा पुन्हा जोरात रंगली असल्यानं युतीवर काय बोलणार हे महत्त्वाचं होतं. कारण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच संजय राऊत यांनी युतीवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आहे आणि राहणार असं म्हणत भाजपावर दबावही टाकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांन केला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी युतीवर बोलताना युतीची काळजी करू नका, हिंदुत्व मानणारे भाजपासोबत येतील असं म्हणत युतीचे संकेत दिले आहेत.


युतीसाठी लाचार नाही

युतीची काळजी नको असं म्हणत भाजपा युतीसाठी आग्रही असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले खरे. मात्र दुसरीकडे भाजपा युतीसाठी लाचार नसल्याचंही ठणकावून सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. तर सोबत आलेल्यांना घेऊन पुढं जाऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. युतीवर बोलतानाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ६० वर्षात केलेले खड्डे बुझवण्यात ५ वर्षात आता कुठं सुरूवात झाली आहे. जे एकमेकांचं तोंड बघत नव्हते ते आता एकमेकांसोबत आले आहेत. ते फक्त मोदी हटाव असा नारा देत. महागठंबधनाचा मुख्य उद्देशच हा आहे. पण विरोधकांनी कितीही आकांततांडव करो, जनता आमच्या पाठिशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.



हेही वाचा -

शिवसेना मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत

अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा