टेलिव्हीजनवरील मालिकांमधून विविध सरकारी योजनांचा प्रचार केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. तसंच, अशाप्रकारे प्रचार करणाऱ्या 'झी टीव्ही' व 'अँड टीव्ही'वरील मालिकांच्या निर्मात्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी 'भाभीजी घर पर है' आणि ‘तुझसे है राब्ता' या हिंदी मालिकांमधून भाजपनं आपल्या कामांचा प्रचार करत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी काँग्रेसतर्फे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयानं घेतली आहे. या दोन्ही टीव्ही वाहिन्यांशी संबंधित मालिकानिर्मात्यांना २४ तासांत त्यांचं म्हणणं मांडण्यास नोटिसद्वारे सांगण्यात आलं आहे. त्यांचं उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही आयोगाकडून करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘तुझसे है राब्ता' या मालिकेतून पंतप्रधान मोदींनी जारी केलेल्या 'मुद्रा योजने'चा आणि 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत योजना' आणि 'उज्ज्वला' योजनेचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा -
प्रवाशांना आता सहज ओळखता येणार बोगस तिकीट तपासणीस
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक